आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्लोडजवळ भीषण अपघात:ओमनी मारुती व्हॅन-टेम्पोत समोरासमोर धडक, महिला जागीच ठार, 12 जण जखमी

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओम्नी मारुती व्हॅन व टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या अपघातात 1 जण जागीच ठार तर 12 जण जखमी झाले. जखमींमध्ये दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हा अपघात औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील डोंगरगाव फाट्यानजीक बुधवारी सायंकाळी घडला.

प्राप्त माहितीनुसार, सुमनबाई उत्‍तम वानखेडे (वय 70, रा. पिशोर नाका, कन्नड) या जागीच ठार झाल्या. विठ्ठल भिकन वानखेडे (वय 30, रा. कन्नड), हिराबाई बाबू केसापुरे (वय 35, रा. जयभवानी नगर, सिल्लोड), कैलास रामराव मोरे (वय 58, रा. कन्नड) योगेश भीमराव बनसोडे (वय 32, रा. कन्नड) हे गंभीर जखमी झाले.

गणेश सखाराम मोरे ( वय 55), छाया विठ्ठल वानखेडे (वय 35), रेखा योगेश बनसोडे (वय 30), जाईबाई भिकन वानखेडे (वय 65), निर्मला कैलास वानखेडे (वय 40), गयाबाई गणेश मोरे (वय 50), गणेश भीमराव वानखेडे( वय 40, सर्व रा. कन्नड), सुनिता शामराव आळणी (वय 35) आणि ठगणाबाई केसापुरे (वय 40, दोघी राहणार जयभवानी नगर सिल्लोड) अशी जखमींची नावे आहेत.

या अपघातातील गंभीर जखमी विठ्ठल भिकन वानखेडे व हिराबाई बाबू केसापुरे यांच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन्ही वाहनांचा अपघात

अपघात होताच अपघातस्थळी जखमींचा आक्रोश सुरू होता. अपघात पाहून अनेक वाहनधारकांनी उपजिल्हा रुग्णालयात फोन करून माहिती दिली. रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती करूनही उशिरापर्यंत शासकीय रुग्णवाहिका येऊ शकली नव्हती. या अपघातातील सर्व जखमींवर सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मुदस्सीर सय्यद यांनी प्राथमिक उपचार केले.

अपघातातील जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी अब्दुल सत्तार मित्र मंडळ व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या रुग्णवाहिका तात्काळ आल्यामुळे जखमींना लगेचच उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

ओमनीतून सुरू होती अवैध वाहतूक

ओमनी मारुती व्हॅन मध्ये अक्षरशहा 13 चे 14 लोकांना कोंबून घेऊन जात होते. यामुळे अशा अपघातांच्या घटना घडतात याकडे वेळीच पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...