आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने उत्कृष्ट ग्रंथांसाठी केदार काळवणे, डॉ. साळुंके, रावळकरांना पुरस्कार

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने उत्कृष्ट ग्रंथांसाठीचे पुरस्कार अध्यक्ष प्राचार्य काैतिकराव ठाले यांनी शुक्रवारी जाहीर केले. २०२१मध्ये प्रसिद्ध पुस्तकांतून प्रा. शेषराव माेहिते यांच्या अध्यक्षतेखाली समितीने या पुरस्कारार्थींची निवड केली. या समितीत कवी बालाजी इंगळे, प्रमाेद माने, डॉ. सुरेंद्र पाटील यांचा समावेश होता. रविवारी (दि. ३ जुलै) पुरस्कार वितरण होईल.

पुरस्कारांचे मानकरी :
-मराठवाड्यातील साहित्यासाठीचा नरहर कुरंदकर वाङ‌्मय पुरस्कार : लातूरच्या प्रा. अनिरुद्ध जाधव यांच्या “मनाशी संवाद’ या आत्मचरित्राला.
-मराठीतील समीक्षा व वैचारिक लेखनासाठी प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार : कळंबचे डॉ. केदार काळवणे यांच्या “कल आणि कस’ समीक्षाग्रंथाला.
-स्व. कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार : साेलापूरच्या कविता मुरुमकर यांच्या ‘उसवायचाय तुझा पाषाण’ या कवितासंग्रहाला.
-उत्कृष्ट कथासंग्रह बी. रघुनाथ पुरस्कार : आैरंगाबादच्या रमेश रावळकरांच्या ‘टिश्यू पेपर’ला.
-उत्कृष्ट नाटक किंवा नाट्य समीक्षण- कुमार देशमुख नाट्य पुरस्कार : बीडच्या डॉ. सतीश साळुंखे यांच्या “मराठवाड्यातील नाट्यपरंपरा’ या संशाेधन ग्रंथाला.
-इतिहास आणि संशाेधन उत्कृष्ट ग्रंथासाठी नरेंद्र माेहरीर वाङ‌्मय पुरस्कार : प्रा. मिलिंद कसबे यांच्या “साहित्य आणि कला : मार्क्स-आंबेडकरी दिशा’ या ग्रंथाला.
-पुस्तक व्यवहारात लक्षणीय कार्यासाठी रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार : नाशिकचे विनायक रानडे.

बातम्या आणखी आहेत...