आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती संगीत महोत्स:रविवारी पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ध्यास परफॉर्मिंग आर्ट््स व तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने ५ फेब्रुवारी (रविवारी) पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी दोन्ही संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिर येथे सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम होईल.

या महोत्सवाचे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे. कार्यक्रमाची सुरुवात नृत्यांगना केतकी नेवपूरकर व त्यांच्या शिष्या भरतनाट्यम सादरीकरणाने करतील. गोव्याचे प्रसिद्ध गायक डॉ. प्रवीण गांवकर यांचे गायन होईल. ज्येष्ठ गायक पं. हेमंत पेंडसे यांचा षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सांगता ज्येष्ठ व प्रसिद्ध गायक पं. सत्यशील देशपांडे यांच्या गायनाने होईल. अश्विनी हिंगे निवेदन करतील. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून श्रोत्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...