आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत आज मुख्यमंत्र्यांची सभा:सभेच्या पूर्वसंध्येला रस्त्यांसाठी 207 कोटी रुपयांचा निधी मंजूर, भाजप आंदोलकांना नोटिसा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भोंग्याविरोधातील सभा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलआक्रोश मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ८ जून रोजी औरंगाबादेत ‘स्वाभिमान’ सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली.

रस्ते व पाणी हे औरंगाबादचे कळीचे मुद्दे असल्याने सभेच्या पूर्वसंध्येला शहरातील २२४ रस्त्यांच्या कामासाठी २०७ कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला. तर ५० टक्के पाणीपट्टी माफीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन मनपाच्या विशेष समितीने अनुकूल अहवाल दिला आहे. सभेसाठी शिवसेनेने महिन्यापासून जय्यत तयारी सुरू केली आहेे.

स्वाभिमान सभेत आज मुख्यमंत्र्यांचे 30 मिनिटे भाषण; दीड हजार पोलिस तैनात

पुन्हा संभाजीनगरचा नारा
१९८८ पासून चर्चेत असलेले औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या सभेत पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. सभेच्या जाहिरातीसाठी व्हायरल केलेल्या टीझरमध्ये याच मुद्द्यावर भर दिला जात आहे.

पाणीटंचाईचे काय?

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होत आहे. मात्र, त्यात पाणीटंचाईचाच मुद्दा लोकांसाठी महत्त्वाचा असेल. त्यावरून भाजपचे काही कार्यकर्ते, पदाधिकारी घोषणाबाजी करू शकतात, अशी भीती व्यक्त झाली. त्यामुळे पोलिसांनी ११ जणांना नोटिसा दिल्या.

४ एप्रिल रोजी मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या बंगल्याबाहेर सरकारविरोधी घोषणाबाजी केल्याबद्दल १ जूनला काढलेली नोटीस ७ जून रोजी बजावण्यात आली. तुम्ही ‘आडदांड’ असून शासनाविरुद्ध घोषणाबाजी करण्याच्या स्वभावाचे दिसून येता. म्हणून वर्षभर सार्वजनिक ठिकाणी शांतता राखण्याची हमी द्या, असे त्यात म्हटले आहे. मंगळवारी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. पण त्याचा भाजपला राजकीय फायदा होऊ शकतो, असे लक्षात आल्यावर “नंतर या’ असे सांगण्यात आले.

सविस्तर वाचा...शिवसेनेला भीती दांडगाईची

बातम्या आणखी आहेत...