आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका प्रशासनाने शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या दहा हजारांवर विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 13 जून रोजी एकुण 10 हजार 724 विद्यार्थ्यांना नवीन दोन गणवेश वाटप केले जाणार आहे. गत दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग असल्याने दोन ऐवजी एकच गणवेश विद्यार्थ्यांना मिळाला होता.
शासनाच्या समग्र शिक्षा अभियानातून मनपा शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके आणि गणवेश देखील दिले जातात. शहरात महापालिकेच्या एकुण 71 शाळा आहेत.
मराठी व उर्दू माध्यमाच्या सर्व मुली, एससी, एसटी प्रवर्गातील मुले आणि दारिद्र्य रेषेखालील सर्व मुलांना मोफत गणवेश वाटप केले जातात. विद्यार्थ्यांची संख्या 10 हजार 724 आहे. या सर्वांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यासाठी 64 लाख 34 हजार 400 रुपये खर्च येणार आहे. या खर्चाला प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. प्रति गणवेश 600 रुपये दिले जाणार आहेत.
गणवेशासाठीची रक्कम त्या त्या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यावर जमा देखील करण्यात आली आहे, अशी माहिती समग्र शिक्षा अभियानचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी दिली. 13 जून रोजी शाळा सुरु होणार आहेत. या पहिल्याच दिवशी पात्र सर्व विद्यार्थ्यांना नवीन गणवेश आणि नवीन पाठ्यपुस्तके समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून दिली जाणार असल्याचेही सांगळे यांनी स्पष्ट केले.
मोफत गणवेशासाठी पात्र विद्यार्थी
विद्यार्थी वर्गवारी | संख्या |
मुली | 5593 |
एससी | 1763 |
एसटी | 75 |
दारिद्र्य रेषेखालील | 3293 |
एकूण पात्र विद्यार्थी | 10724 |
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.