आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळवार आणि बुधवार अशा २ दिवसांत तब्बल १०६ शासन निर्णय निघाले. यामध्ये सर्वाधिक जीआर पाणीपुरवठा व जलसंधारण विभागाचे आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनांना मंजुरी व कोल्हापुरी, सिमेंट बंधाऱ्यांच्या अंदाजपत्रकीय किंमती दीडपट करण्याचे निर्णय घेतले आहेत. एका दिवसाचे कामाचे ८ तास गृहीत धरले तर प्रत्येक नवव्या मिनिटाला एक जीआर जारी झाला. शक्यतो दररोज सरासरी २० ते ३० जीआर निघतात. मात्र १५ जून ते २२ जून या ८ दिवसांमध्ये ३०३ जीआर निघाले. यातील १०६ शासन निर्णय हे २१ आणि २२ जून या दोन दिवसांमधील आहेत. मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडील मृद व जलसंधारण खात्यातून २ दिवसांमध्ये २३ जीआर काढले. ते सर्व कोल्हापुरी, सिमेंट बंधाऱ्यांच्या किमती वाढवणारे आहेत. त्या दीडपटीने वाढवल्या आहेत.
आमदारांना १७७० कोटींपैकी ३१९ कोटी रु.चा विकास निधी
मनोज व्हटकर | सोलापूर
जाता जाता अर्थ, नियोजन विभागाने आमदारांना स्थानिक विकास कार्यक्रमाचा ३१९ कोटींचा निधी वितरित केला आहे. वास्तविक सर्वांना एकूण १७७० कोटी मिळायला हवेत. जो निधी मिळाला आहे, त्यात जास्त आमदारांच्या मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक या जिल्ह्यांना सर्वाधिक निधी मिळाला. ५ जिल्ह्यांना शून्य आणि ११ जिल्ह्यांना केवळ एक विधान परिषदेचा आमदार असल्याने कमी निधीचा फटका बसला आहे. २८७ विधानसभा सदस्यांना प्रत्येकी ९२ लाखांप्रमाणे आणि विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ विचारात घेऊन असे एकूण ३१९ कोटी ६६ लाख ६७ हजार एवढा निधी वितरित करण्यात येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.