आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कळमनुरी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने मजूर देवजणा गावी पोहोचले

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • कोपरगाव येथून वाहनांसोबतच भोजनाचीही व्यवस्था

अहमदनगर जिल्हयातील कोपरगाव रस्त्यावरून लहान मुलांसह पायी येत असलेल्या मजुरांसाठी कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी तातडीने कोपरगाव येथे महसुल प्रशासनासोबत संपर्क साधून मजुरांच्या वाहनाची तसेच भोजनाची व्यवस्था करून त्यांना देवजणा (ता.कळमनुरी) येथे शुक्रवारी (ता. 8) सुखरुप पोहोचविले. कर्तव्यनिष्ठ व शिस्तीच्या अधिकाऱ्यांमधेही माणुस जपलेला असतो याचे चित्र दिसून आल्याच्या प्रतिक्रिया मजूरांसह गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. 

कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांची कर्तव्यदक्ष व शिस्तीचे अधिकारी म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. शासकिय कर्तव्य पार पाडतांना कोणत्याही दवाबाला बळी न पडता काम करणे हि त्यांची हातोटी जिल्हावासीयांना परिचित आहे. वाळूस्तरांना आळा घालण्यासोबतच त्यांनी अनेकांना हद्दपार करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामध्ये काही राजकिय पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. 

दरम्यान, कळमनुरी तालुक्या देवजणा व परिसरातील मरडगा, नवखा, निवघा येथील ३३ मजूर इगतपुरी येथे कामाला गेले होते. मात्र संचारबंदीमुळे हाताला काम नसल्याने ते परत गावी निघाले. मात्र वाहनाची व्यवस्था नसल्याने मजूर लहानमुलांसह पायीच गावी निघाले. सुमारे दिडशे किलो मिटर पायी चालून हे मजूर कोपरगाव येथे आल्यानंतर त्यांच्या देवजणा येथील नातेवाईकांनी त्यांनी गावी परतण्यासाठी सहन करावे लागणाऱ्या परिस्थितीची माहिती दिली. देवजणा येथील गावकरी लक्ष्मण धोत्रे, दिलीप कल्याणकर,मुन्ना मगर यांनी पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर खेडेकर यांनी कोपरगाव येथील तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क करून मजुरांसाठी भोजन तसेच वाहनाची व्यवस्था करण्याचे कळविले. त्यानुसार या मजूरांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली त्यांना भोजन दिल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून वाहनाद्वारे गावी देवजणा येथे रवाना करण्यात आले. आज सकाळी गावी आलेल्या या मजुरांचे व त्यांच्या कुटुंबियांचे चेहरे आनंदले होते.

बातम्या आणखी आहेत...