आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे; त्याप्रमाणेच हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा अृमत महोत्सवही साजरा व्हावा, यासाठी राज्य शासनाने 75 कोटींचा निधी दिला आहे. यातून प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यात उपक्रम राबवण्यात येणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात 9 कोटींतून 8 स्मारकांचे पुर्नरुज्जीवन केले जाणार असून स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने अभ्यासिका सुरु करण्यात येणारआहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आज दिली.
देश स्वतंत्र झाला तरी निजाम हैदराबाद सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा प्रचंड संघर्षमय झाला. अनेकांनी यात प्राणांची आहुती दिली होती. या हुतात्मांना आदरांजली म्हणून जिल्हयात आठ ठिकाणी असलेल्या हुतात्मा स्मारकांचे पुर्नउज्जीवन करण्यात येणार आहे. याठिकाणी ग्रंथालय तसेच अभ्यासिका सुरु करण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने अभ्यासिका चालवल्या जातील असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
या स्मारकांसमोर विजयस्तंभ देखील उभारण्यात येणार आहेत. या स्तंभावर त्या-त्या भागातील हुतात्मांची यशोगाथा लिहीली जाणार आहे. जेणेकरुन नव्यापिढीला हुतात्मांची माहिती होईल. प्रत्येक जिल्ह्याने अशाच पद्धतीने कल्पक उपक्रम घेणे अपेक्षित आहे. औरंगाबाद जिल्हयाचे काम वेगवानपणे मार्गी लावण्याचा मानस आहे.
या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे काम करत आहेत. मुळे म्हणाले, हे काम वेगाने पुर्ण करण्याचा आमचा प्रयत् आहे. मुक्तीसंग्राम दिनाला हे काम पुर्ण करुन त्याचे लोकार्पण केले जाईल.
हुतात्मा स्मारक | हुतात्म्यांचे नाव | गाव | ||
लाडसावंगी | काशिनाथ म्हस्के | हातमाळी गाव | ||
बोरगाव अर्ज | सांडूजी वाघ | बोरगाव अर्ज | ||
धानोरा | जयाजी साळुंके, श्रीपत भिवराव साळुंके, सांडू साळुंके, तात्याबा साळुंके | धानोरा गाव | ||
जरांडी | विश्वनाथ राजहंस | जरांडी | ||
फर्दापूर | हिरालाल जैस्वाल, तुळशीराम जैस्वाल, दगडु बलांडे, सादव बालांडे, सांडू बालांडे, तुकाराम वाघ, नामदेव वाघ, गोविंदा साबळे | फर्दापूर | ||
पैठण |
| दांगटपुरी | ||
जातेगाव | जगजीवन राम, जगन्नाथ भालेराव, गंगाधर पेरेवार | महाकाळवड | ||
वैजापूर | जगन्नाथ भालेराव | महाकाळवड | ||
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.