आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना योद्ध्यांचा सन्मान:‘डॉक्टर्स डे’निमित्त आज कोरोना योद्ध्यांचा सन्मान, राज्यभरातील 15 डॉक्टर व 3 तज्ञांना ‘दिव्य मराठी’तर्फे केले जाणार सन्मानित

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आरोग्यमंत्री साधणार तज्ञ डॉक्टरांशी संवाद

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी राज्यातील हजारो डॉक्टर अविरत सेवा देत आहेत. अशा कोरोना योद्धा डॉक्टरांंना ‘दिव्य मराठी’तर्फे बुधवारी (दि.१ जुलै) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आयोजित ऑनलाइन वेबिनार कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. या वेबिनारमध्ये विविध जिल्ह्यांतील १५० हून अधिक तज्ञ डॉक्टर सहभागी होणार असून मंत्री राजेश टोपे याप्रसंगी डॉक्टरांशी संवाद साधणार आहेत.

सायंकाळी ६:३० ते ७:३० या कालावधीत ऑनलाइन झूम अॅपच्या माध्यमातून हा सोहळा होईल. राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. यात वैद्यकीय क्षेत्रावर ताण येत आहे. असे असतानाही राज्यातील डॉक्टर मागील चार महिन्यांपासून विविध जिल्ह्यांत अविरत सेवा देत आहेत. कोरोनाबाधितांवर उपचार करून ते रुग्णसेवा देत आहेत. अशा १५ तज्ञ डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या तीन तज्ञांचा ऑनलाइन सोहळ्यात सन्मान केला जाणार आहे. लॉकडाऊनमध्ये राज्यातील डॉक्टरांचा सन्मान करणारे ‘दिव्य मराठी’ हे पहिले व एकमेव दैनिक आहे.

यांचा होणार सन्मान

डॉ. विजय दहिफळे, डॉ. सुभाष भोपळे, डॉ. अजीज कादरी, डॉ. बाळासाहेब पवार, डॉ. सुभाष शेळके, डॉ. विराज बोरगावकर, डॉ. विजय मिटकरी, डॉ. विष्णू बाबर, डॉ. सुरेश जंगले, डॉ. बाबासाहेब इंगळे, डॉ. निखिल राजपूत, डॉ. सचिन पंडित, डॉ. अश्विनी गलांडे, डॉ. मेराज कादरी, डॉ. हर्षल तोडरवाल, डॉ. जगदीश वाबळे, डॉ. अतुल नरसाळे, डॉ. प्रकाश कांकरिया आदी डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या परिमल पालेजा, पवनसिंग राजपूत, डॅनियल इंगळे आदींचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे.

टोपेंच्या उपस्थितीत १५० डॉक्टरांचा वेबिनार

आैरंगाबादसह जालना, बीडचे डॉक्टर होतील सहभागी सोहळ्यात औरंगाबाद जिल्हा, शहर, बीड, जालना, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक आदी जिल्ह्यांतील १५० पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर सहभागी होणार असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे प्रथमच त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...