आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:पूर्णवाद अमृतमहोत्सवानिमित्त 15 ते 19 डिसेंबरदरम्यान पारायण सोहळ्याचे आयोजन

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेरकर गुरुसेवा मंडळ संचालित पारनेरचे पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठान आणि पूर्णवाद परिवाराच्या वतीने पूर्णवाद अमृतमहोत्सवाचे आयोजन १५ ते १९ डिसेंबरदरम्यान केले आहे. या महोत्सवात पूर्णवाद पारायण होणार आहे. समर्थनगरातील शिवराम प्रतिष्ठान येथे दररोज सायंकाळी ७.३० वाजता डॉ. विश्वासराव पाटील यांचे निरूपण होईल. दररोज सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान अनुराधा जहागीरदार यांचे ग्रंथवाचन होणार आहे. या वेळी पारनेर येथील पारनेरकर गुरुसेवा ट्रस्टचे अध्यक्ष गुणेश पारनेरकर, अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...