आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडाॅ. शुभदा लोहिया यांनी लिहिलेले “रुग्णांच्या चष्म्यातून’ पुस्तक सर्वांसह वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही उपयोगी आहे. यातून डाॅक्टर व रुग्ण यांचे नाते व संवाद कसा असावा ते लक्षात येते, असे प्रतिपादन डॉ. आनंद निकाळजे यांनी रविवारी केले. डाॅ. शुभदा लोहिया यांनी लिहिलेल्या व साधना प्रकाशनने प्रकाशित केलेल्या “रुग्णांच्या चष्म्यातून’ पुस्तकाचे प्रकाशन पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर व औषधवैद्यकशास्त्रतज्ज्ञ डाॅ. आनंद निकाळजे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी डाॅ. निकाळजे बोलत होते. व्यासपीठावर लेखिका डाॅ. शुभदा लोहिया यांचीही उपस्थिती होती.
या वेळी डाॅक्टर, नागरिक यांच्यात निर्माण झालेले प्रश्नांवर परिसंवाद झाला. डाॅ. शुभदा लोहिया यांनी लेखिका म्हणून भूमिका मांडली. अभिजित जोंधळे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सागर कुलकर्णी यांनी केले.आरोग्यसेवा मजबूत असावी : देऊळगावकर: देशात जसा मानवी हक्क आयोग आहे, त्याप्रमाणे जागतिक आरोग्य व समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी आरोग्य हक्क आयोग असला पाहिजे. यातून सार्वजनिक आरोग्यसेवा मजबूत होईल. प्रत्येक रुग्णामध्येही एक डॉक्टर दडलेला आहे, असे अतुल देऊळगावकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.