आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:खरेदीच्या बहाण्याने महिलेने सराफा दुकानामधून लांबवले सहा ग्रॅम सोने

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तोंडाला स्कार्फ बांधून खरेदीच्या बहाण्याने सराफा दुकानात आलेल्या महिलेने २२ कॅरेटचे सहा ग्रॅम सोन्याचे ब्रासलेट लंपास केले. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी शुक्रवारी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.सराफा व्यापारी विकास कोठारी कॅनॉट प्लेस येथे महावीर ज्वेलर्समध्ये व्यवस्थापक आहेत. ते १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दुकानात असताना तोंडाला स्कार्फ बांधून सोन्याची अंगठी व ब्रासलेट खरेदी करण्यासाठी एक महिला आली होती. त्यांना महिला कर्मचाऱ्यानी दागिने दाखवण्यास सुरूवात केली. बराच वेळ दागिने पाहून काहीही न घेता ती महिला निघून गेली. मात्र, पाच मिनिटांनी दागिन्यांचे मोजमाप करताना कर्मचाऱ्यांना एक ब्रासलेट कमी असल्याचे लक्षात आले. कोठारी यांनी तत्काळ बाहेर येऊन महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीने ताेपर्यंत पोबारा केला होता. परंतु, त्यांनी त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन महिलेविरोधात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...