आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौर्य दिन:पहिल्याच दिवशी बुद्धविहाराला मिळाली 77 हजारांची देणगी ; कोरेगाव भीमा स्तंभाला अभिवादन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जटवाडा रोड येथील सारा वैभव परिसरात भीमा कोरेगाव शौर्यदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्रिपिटक बुद्धविहार निर्माणासाठी पहिल्याच दिवशी ७७ हजारांचे आर्थिक योगदान मिळाले. विशेष म्हणजे सेवानिवृत्त बकाचंद पडवळ यांनी महिनाभराचे पेन्शन ५१ हजार रोख दिले.

एकेकाळी नालंदा जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठांच्या श्रेणीत होते. मात्र, आज जगातील ५०० विद्यापीठांच्या क्रमवारीत भारतातील एकही विद्यापीठ नाही ही गंभीर चिंतेची बाब आहे. प्रत्येकाने शिक्षण घेतले पाहीजे. नोकरी किंवा उद्योग केले पाहिजेत. यातून स्वत:सोबतच इतरांचीही प्रगती होते, असा सल्ला स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त महाव्यवस्थापक अंबादास रगडे यांनी दिला. त्रिपिटक बुद्धविहार समितीने २०५ व्या शौर्यदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन केले होते. या वेळी रगडे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. आयएचएमचे प्रा. डॉ. सतीश पवार प्रमुख पाहुणे म्हणून, तर अध्यक्षस्थानी अशोक हिवराळे उपस्थित. विनोद मोरे यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. पवार म्हणाले, सर्व जाती-धर्मांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कारण प्रतिगामी शक्तींचे संकट मोठे आहे. मंदिर, गुरुद्वारा, मशीद, बुद्धविहार आणि चर्चमध्ये चांगलेच संस्कार दिले जातात. त्यामुळे बुद्धविहार निर्मिती ही सर्वांची जबाबदारी आहे. विनोद मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

पराक्रमाची आठवण देणारा देखणा स्तंभ महानगरपालिका बहुजन कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय रगडे यांनी कोरेगाव भीमा स्तंभाची प्रतिकृती या ठिकाणी बनवून दिली. पराक्रमाची आठवण देणारा हा स्तंभ विशेष आहे. बुद्धविहारात होणार मेडिटेशन सेंटरची उभारणी बकाचंद पडवळ यांनी ५१ हजार, सतीश पवार यांनी ११ हजार, मिलिंद बनसोडे यांनी १० हजार आणि इतरांनी मिळून ७७ हजारांची वर्गणी संकलित झाली. या ठिकाणी मेडिटेशन सेंटरचीही उभारणी केली जाणार आहे.

स्त्रियांनी जागरूक व्हावे : मानसिक पातळीवर समाज रसातळाला जात आहे. याकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे. स्त्रियांनी विशेष जागरूक राहण्याचा हा काळ आहे, असे आवाहन लताबाई पवार यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...