आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:आजपासून मान्सून परतीच्या वाटेवर; 7 ते 9 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल स्थिती असून ६ ऑक्टोबरपासून तो परतीच्या वाटेवर निघेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान राज्यात मात्र पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. ७ ते ९ ऑक्टोबर या काळात विदर्भ वगळता राज्याच्या इतर भागात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.

मान्सूनच्या परतीसाठी वायव्य भारतात अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे ६ ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान मध्य भारत, दक्षिण भारतात मात्र मान्सून आणखी काही दिवस सक्रिय राहू शकतो.

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
कुलाबा वेधशाळेनुसार, राज्यात दि. ६ ते ९ ऑक्टोबर या काळात विदर्भ वगळता सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात मराठवाडा, कोकण, उत्तर व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. राज्यातील २१ जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या चार दिवसांत मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...