आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:वटपौर्णिमेला तासाभरात तीन ठिकाणी सात चोरांनी हिसकावली तीन मंगळसूत्रे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • समर्थनगर, वाल्मी नाका, वाळूज येथील घटनेत दुचाकीस्वार चोर वेगवेगळे

वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी गुरुवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या महिलांना मंगळसूत्र चोरट्यांनी लक्ष्य केले. सात चोरट्यांनी तीन दुचाकींवरून अवघ्या एका तासात समर्थनगर, वाल्मी नाका व वाळूज येथून तीन महिलांची सोनसाखळी, मंगळसूत्रे हिसकावून नेली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सर्व ठाणे प्रभारी, अधिकारी व गुन्हे शाखेला वटपौर्णिमेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या होत्या.

मागील दीड वर्षापासून मंगळसूत्र हिसकावणारे चाेरटे अद्याप पोलिसांना सापडले नाहीत. वटपौर्णिमेनिमित्त महिला पूजेसाठी सोन्याचे दागदागिने, मंगळसूत्र, सोनसाखळी परिधान करून बाहेर पडतात. चाेरट्यांनी हीच नामी संधी हेरली. सर्वाधिक गर्दी होणाऱ्या वडाच्या झाडाजवळ पोलिस तैनात करण्यात आले हाेते. मात्र, चोरांनी भरवस्तीत धुमाकूळ घातला.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार
रात्री उशिरापर्यंत सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे, वाळूज परिसरात संक्रांतीच्या दिवशी त्याच ठिकाणी मंगळसूत्र चोरी झाली होती. गुरुवारी गस्तीवरील पोलिस गेले आणि दहा मिनिटांनी चोरांनी तेथून मंगळसूत्र हिसकावले. तिन्ही ठिकाणी वेगवेगळे चोर असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. दोन ठिकाणी दोन दुचाकीस्वार तर वाल्मी परिसरातील घटनेत चाेर ट्रिपल सीट होते.

पहिली घटना : चोरटे विनाक्रमांकाच्या पल्सरवर आले
समर्थनगर येथील कसबेकर हॉस्पिटलजवळ राहणाऱ्या स्वाती काळेगावकर सकाळी १०.३० वाजता राम मंदिराच्या आवारातील झाडाची पूजा करण्यासाठी निघाल्या. सुंदर लॉज जवळून जाताना विना क्रमांकाच्या काळ्या पल्ससरवरून अालेल्या चाेरट्यांनी त्यांचे ४ तोळे अडीच ग्रॅमचे मनी मंगळसूत्र हिसकावले. दुचाकी चालवणारा अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील, पांढरा शर्ट परिधान केलेला तर पाठीमागे बसलेला अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील व राखाडी रंगाचा शर्ट घातलेला सडपातळ बांध्याचा होता.

दुसरी घटना : अपाचेसारख्या स्पोर्ट््स बाइकचा वापर
सिडको वाळूज महानगरातील नीलिमा मधुकर पोखरकर (३८) मैत्रिणींसह गणेशनगरातून पूजा आटोपून ११ वाजता पाइपलाइन रोडने जात हाेत्या. तेव्हा काळ्या रंगाच्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सहा तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून तोेडले. पोखरकर यांनी ते पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पेंडल हाती राहिले. दुचाकी चालवणाऱ्याने पांढरा शर्ट, काळ्या रंगाची पँट तर मागच्या चोराने निळा शर्ट व निळी जिन्स घातली होती. दोघेही अंदाजे २५ ते ३० वयोगटातील हाेते. काळ्या रंगाची पल्सर किंवा अपाचे सारख्या स्पोर्ट््स बाइकवर अाले हाेते.

तिसरी घटना : पल्सरने सोलापूर-धुळे हायवेने पळाले
पैठण रस्त्यावरील अमृत सारा सिटीतील शिक्षिका कविता दलसिंग घुण (३४) या ११.३० वाजता कांचनवाडी पूजेच्या साहित्य खरेदी करून मोपेडने घरी जात हाेत्या. वाल्मी गेट पुलाजवळ काळ्या रंगाच्या पल्सरवर ट्रिपल सीट आलेल्यांपैकी पाठीमागच्या चाेरट्यांने त्यांचे १५ ग्रॅम सोन्याचे गंठण हिसकावले. मागचा चाेरटा अंदाजे २२ वर्षांचा व सडपातळ, पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला होता. कविता यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोर सोलापूर-धुळे हायवेवरून सुसाट निघून गेले. त्यांनी संताजी पाेलिस चौकी गाठत तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...