आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:गंगापूर कारखाना घोटाळ्याप्रकरणी आमदार प्रशांत बंब यांची दीड तास चौकशी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर साखर कारखान्यात १५ कोटी ७५ लाख रुपयांच्या कथित अपहार प्रकरणात गंगापूर येथील भाजपचे आमदार प्रशांत बंब यांची बुधवारी पाेलिसांनी चौकशी केली. पाेलिस अधीक्षक कार्यालयात जवळपास दीड तास झालेल्या चौकशीमध्ये बंब यांच्यावर एफआयआरमध्ये केलेल्या आरोपांविषयी विचारपूस करण्यात आली.

काही महिन्यांपूर्वी आमदार बंब यांच्यासह सोळा जणांवर गंगापूर साखर कारखान्यात १५ कोटी ७५ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. २०१३ मध्ये कारखान्याची विक्री सर्व सभासदांनी एकत्र येत डीआरटी कोर्टात पैसे जमा केले होते. परंतु त्यानंतर कारखान्याचा विक्रीची प्रक्रिया रद्द झाल्याने न्यायालयाकडून ही रक्कम कारखान्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्यात बंब व इतर सोळा जणांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करत यातील १५ कोटी ७५ लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला. राज्यभर हे प्रकरण गाजले. काही महिन्यांपूर्वी कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला. जानेवारी महिन्यात यातील काही आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने सहा जणांचे अर्ज फेटाळून लावले. ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. पैठणचे उपविभागीय पाेलिस अधिकारी गोरख भामरे यांची पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

अटकपूर्व जामीन मागितलेला नाही : आमदार बंब : गुन्हा दाखल होताच आम्ही कारखान्याशी संबंधित दीड हजार पाने, काही रिपोर्ट पोलिसांना सुपूर्द केले असल्याचे आमदार बंब यांनी माध्यमांना सांगितले. हा गुन्हा केवळ राजकीय सुडातून दाखल झालेला असल्याने यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तरीही पोलिसांना सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. अटकेचा धोका आपल्याला पहिल्यापासून नाही. आमचे काही सभासद न्यायालयात गेले असले तरी मी अद्याप अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेलाे नाही, असे बंब म्हणाले.

बंब यांनीही दिली महत्त्वाची कागदपत्रे
आमदार बंब यांच्यासह इतर आरोपींना बुधवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पाेलिस अधिकारी गाेरख भामरे यांनी जवळपास दीड तास बंब यांची चौकशी केली. यात तक्रारदाराने केलेल्या प्रत्येक आरोपाविषयी बंब यांना प्रश्न विचारण्यात आले. या वेळी बंब यांनीदेखील कारखान्याशी संबंधित कागदपत्रे पोलिसांकडे सादर केली. यापुढेदेखील गरज पडल्यास पुन्हा बोलावण्यात येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...