आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष:स्मारके, स्मृती भवनांचा दीडशे काेटींचा प्रस्ताव प्रतीक्षेत.

प्रवीण ब्रह्मपूरकर | आैरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्याला १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मराठवाड्याच्या याच अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध स्मारके आणि स्मृती भवन उभारणे यासह विविध कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी साधारण दीडशे कोटींचा प्रस्तावदेखील तयार करण्यात आला. मात्र सरकार बदलल्यानंतर या प्रस्तावावर अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मराठवाड्यात विविध योजना राबवण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. मात्र सरकार बदलल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून नंतरची प्रक्रिया थंडावली आहे.

आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याच्या केल्या सूचना मंत्रालयीन पातळीवर उपसमिती नेमण्यात आली होती. त्यात निधी देण्याचे ठरवण्यात आले होते. या वेळी तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील मराठवाड्यात या निमित्ताने लोकांचे कॅन्सरबाबत स्क्रीनिंग करण्यात यावे. यासाठी कॅन्सर डिटेक्शन व्हॅनच्या माध्यमातून मराठवाड्यात सर्वत्र तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, अशी माहिती टोपे यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

सामान्य प्रशासन विभागाकडून निर्णयाची प्रतीक्षा दोन महिन्यांपूर्वी नवे सरकार स्थापन झाले. या निधीच्या मान्यतेबाबत सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाकडून अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुढची कार्यवाही थांबलेली आहे.

भावनांशी खेळू नये ^महाविकास आघाडी सरकारतर्फे हे प्रस्ताव मंजूर केले होते. नवे सरकार याला आडकाठी करण्याचा प्रयत्न करत आहे. आघाडी सरकारने जे केले होते त्यामध्ये निधीची वाढ करत सरकारने प्रस्ताव मंजूर केला पाहिजे. मराठवाड्याच्या अस्मितेचा विषय असल्यामुळे भावनांशी खेळू नये.

- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद. निधी मिळाला पाहिजे ^मराठवाड्यात सर्वत्र गावात जाऊन कॅन्सरचे स्क्रीनिंग करण्यात यावे, अशा सूचना मी मांडल्या होत्या. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्रामासाठी हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. नव्या सरकारनेदेखील त्याला मंजुरी द्यावी. - राजेश टोपे, माजी आरोग्यमंत्री.

बातम्या आणखी आहेत...