आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारव संवर्धन:समर्थनगरमधील बारवेची दीडशे जणांनी दोन तास केली स्वच्छता ; सर्वतोपरी मदत केली जाणार

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समर्थनगर येथील बारव स्वच्छ करण्यासाठी देवगिरी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. रविवारी (१९ जून) सकाळी साडेसहा वाजेपासून १५० कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. देशभक्तिपर गाणे, “भारत माता की जय’, “वंदे मातरम’ अशी घोषणाबाजी करत स्वच्छता करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जलदूतच्या या कामाचे कौतुक करत बारव संवर्धनासाठी सर्व मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. समर्थनगरात सकाळीच घमेले, फावडे, झाडू, दोरी, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, कुऱ्हाडी अशी सुसज्ज तयारी करत श्रमदानासाठी कर्चमारी एकत्र आले होते. मनपाकडूनही अग्निशमन दलाचे पथक, कचरा गाडी पथक, पाणी उपसण्याचा पंप अशी तयारी करण्यात आली होती. दोन तासांत पंधरा ट्रिप कचरा, झुडपे तोडण्यात आली.

आम्ही केवळ कृती करणार

देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले, औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नावर केवळ वायफळ चर्चा होते. मात्र प्रत्यक्षात कृती होत नाही. त्यामुळे अशा चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतूनच उपाय करता येऊ शकतात हे वांरवार करून दाखवले आहे. यावेळी देवगिरी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बारवांचे संवर्धन, बोअरवेल पुनर्भरणाची माहिती दिली. सहायक पोलिस उपायुक्त बालाजी सोनटक्के यांनी जलसंवर्धनसाठी नागरिकांनी प्रत्येक पावसाचा थेंब साठविणे गरजेचे आहे. हे आपले आद्य कर्तव्य समजून युवकांनी या चळवळीत झोकून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी देवगिरी बँक व जलदूतांचे कौतुक केले. या वेळी डॉ. अभय कुलकर्णी, श्रीकांत उमरीकर, देवेंद्र देव, प्रा. संजय गायकवाड, संचालक जयंत अभ्यंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रविन नांदेडकर, जयंत देशपांडे, अमृता पालोदकर, मनाली कुलकर्णी, संजीवनी शेजूळ, दत्ता हुड, विकास ठाले, सिद्धार्थ साळवे यांची उपस्थिती होती. आभार संजय गायकवाड यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...