आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहात:मेसा संघटनेतर्फे एकदिवसीय शिक्षण परिषद उत्साहात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र इंग्रजी स्कूल असोसिएशनतर्फे (मेसा )च्या वतीने एकदिवसीय शिक्षण परिषद हॉटेल अॅम्बेसेडर अजंता येथे पार पडली. शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी परिषदेचे उद्घाटन केले. शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख अध्यक्षस्थानी हाेते. शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, उपशिक्षणाधिकारी लाइफ सोफी, संगीता साळवे, सीताराम पवार, संगीता साळुंके, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या उपाध्यक्षा जागृती धर्माधिकारी, शरदचंद्र धारूरकर, वाल्मीक सुरासे, मनोज पाटील, गजानन वाळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी मेसा संघटनेचे माजी राज्य सचिव विश्वासराव दाभाडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील मगर यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे प्रवक्ता प्रल्हाद शिंदे, राज्याध्यक्ष प्रवीण आव्हाळे यांनी मार्गदर्शन केले. कार्याध्यक्ष हनुमंतराव भोंडवे, डॉ. शिवानंद भानुसे यांनी सूत्रसंचालन केले. सचिव संदीप लगाने यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...