आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:जिल्हा परिषद शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहायता निधीला

औरंगाबाद                    2 वर्षांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

कोरोनाचे महाराष्ट्र राज्यावर आलेले संकट लक्षात घेता जिल्हा परिषद शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात येणार असल्याचे पत्र जि.प. शिक्षणाधिकारी एस.पी. जयस्वाल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमतीने काढले आहे. हे पत्र गटशिक्षणाधिकारी, जि.प. मुख्याध्यापकांना पाठविण्यात आले आहे.

कोविड 19 विषाणुचे संकट लक्षात घेता शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी व जिल्हा परिषद - शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहायता निधीला देण्याबाबत चर्चा 5 मे राेजी व्हिसी च्या माध्यमातुन करण्यात आली. या चर्चेदरम्यान सर्व जिल्हा परिषद शिक्षक संघटना यांनी सामुहिक सहमती दर्शवली असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी पत्रात म्हटले आहे. यामुळे सर्व जि.प. माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन लेखी पत्रकातुन रितसर कपात करण्यात येणार आहे. तथापि वेतन कपात करण्यापुर्वी सर्व शिक्षकांना दुरध्वनी व्दारे संपर्क साधुन वेतन कपात विषयी संमती गटशिक्षणाधिकारी, जि.प. मुख्याध्यापकांना यांना घ्यावी लागणार आहे. तसेच संबंधित शिक्षकास व्हॉटस् अॅप व्दारे लेखी संमती पत्र पाठविणे गरजेचे आहे.

प्राप्त स्कॅन संमतीपत्राचे आधारे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे. कपातीची नोंद स्पेशन डिडक्शन रकान्यात होणार आहे. मुख्याध्यापकाने लेखी संमतीपत्र ंजतन करावे लागेल त्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कपात लेखी संमती पत्राचे आधारे केल्याची खात्री करणे आवश्यक असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...