आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:हिंगोली जिल्ह्यात 296 गावांमध्ये एक गाव एक गणपती, पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यांमध्ये 296 ठिकाणी एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.हिंगोली जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी गणेश मुर्तीची शांततेत स्थापना करण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, यांच्यासह पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी गणेश मंडळांच्या व शांतता समितीच्या बैठका घेऊन कोविडच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

गणेश मंडळांनी एक गाव एक गणपती राबविण्याचे आवाहन करण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यात प्रशासनाच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 296 गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यामुळे या गावांमधून गणेशमूर्ती पाहण्यासाठी होणारी गर्दी कमी होणार आहे.त्यातून सामाजिक अंतराचे पालन देखील होणार आहे. दमण जिल्ह्यामध्ये एकूण 980 ठिकाणी गणेशमूर्तींची स्थापना झाली आहे. यामध्ये शहरी भागात २४९ ठिकाणी ग्रामीण भागामध्ये 731 ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने गणेशमूर्ती स्थापना मिरवणुकीला परवानगी नाकारली. त्यामुळे गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशमुर्तीची स्थापना केली आहे. दमण जिल्ह्यात गणेश मंडळांच्या ठिकाणी तसेच संवेदनशील भागात पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दलाचे जवान तसेच गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...