आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगी स्वागत:शंभर टक्के गुण, विद्यार्थिनींची रथात मिरवणूक

जंगी स्वागत11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथील ज्ञानेश विद्यामंदिरच्या स्नेहल सूर्यवंशी व करिष्मा राजभर यांनी दहावीत सर्व विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवले. याबद्दल दाेघींची शाळेने रथातून मिरवणूक काढली. यंदा ३० मिनिटे वेळ वाढवला, १.६४% निकाल जास्त लागला

राज्यात 122 िवद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
राज्यात शंभर टक्के गुण मिळवणारे १२२ विद्यार्थी आहेत. यात लातूरचे ७० विद्यार्थी आहेत. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी ८३ हजार ६० एवढे आहेत.

कोरोनामुळे अनेकांची लिहिण्याची सवय मोडली होती. त्यामुळे यंदा बोर्डाने सर्व परीक्षार्थींसाठी अर्ध्या तासाचा वेळ वाढवून दिला होता. २०२० मधील परीक्षेच्या निकालाच्या तुलनेत यंदा १.६४ टक्के जास्त निकाल लागला आहे. म्हणजेच वाढीव वेळेचा फायदा विद्यार्थ्यांना झाल्याचे दिसते.

२७ जुलै ते १२ ऑगस्टदरम्यान होणार दहावीची पुरवणी परीक्षा
बारावीची पुरवणी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्टदरम्यान तर दहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्टदरम्यान घेतली जाईल. त्यासाठी २० जूनपासून ऑनलाइन अर्ज करता येतील, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी शुक्रवारी दिली.

बातम्या आणखी आहेत...