आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या पथकाची कारवाई:क्रांती चौक परिसरातील ‘हाॅटेल मॅनाेर’ने घेतलेले एक इंची नळ कनेक्शन ताेडले

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शक्कल लढवून हितसंबंध जोपासण्यासाठी नळजोडण्या दिल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. क्रांती चौकातील हॉटेल मॅनोरला कोटला कॉलनीच्या जलकुंभाच्या पाइपलाइनवरून दिलेले एक इंची नळ कनेक्शन मनपाच्या पथकाने मंगळवारी ताेडले. हॉटेल मालक महापालिकेचे कंत्राटदार आहेत हे विशेष. हाॅटेल मॅनाेरला कोटला कॉलनी येथील जलकुंभाच्या पाइपलाइनवरून एक इंची नळ कनेक्शन दिले हाेते. यावरून चाेवीस तास पाणीपुरवठा हाेत हाेता. ही माहिती मिळाल्यानंतर पथकाने कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...