आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

पाचोड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील मुरमा शिवारात एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण गंभीररीत्या जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १८ जून रोजी संध्याकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. डोणगाव, ता. अंबड येथील रहिवासी प्रभाकर विष्णू उबाळे हे आपल्या मुलीला सासरी सोडून परत डोणगावकडे दुचाकीवर एमएच २१ बीजे ९३४७ येताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पैठण तालुक्यातील मुरमा शिवारातील रात्री १० वाजेच्या दरम्यान औरंगाबादकडून बीडकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.

बातम्या आणखी आहेत...