आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:​​​​​​​जिंतूर-जालना रोडवर दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक दाखल

परभणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील पांढरगळा येथील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय तरुणाचा जालना रोडवर गुरुवार दि. 16 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मोटार सायकल सह मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनांची दाखल होत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिंतूर शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर तालुक्यातील पांढरगळा येथील राशन दुकानदार असलेले डिगांबर किशनराव कवडे (वय 45वर्ष) हे बुधवार रोजी रात्री दुचाकी वाहन घेऊन घराबाहेर गेले होते. परंतु रात्रभर घरी आले नाहीत, दरम्यान जालना रोडवरील बेलखेडा पाटी जवळील बोर्डीकर इंग्लिश स्कूल जवळ अपघातग्रस्त गाडी व मृत व्यक्ती पडलेला असल्याचे पोलिसांना सांगितले.

यावरून तत्काळ पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, सपोनि गायकवाड, सपोनि पन्हाळकर, पोउपनी भाऊसाहेब चौरे, पोलीस कर्मचारी पुंडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. यावेळी घटनास्थळी नातेवाईक व नागरिकांनी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...