आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:दुधना नदीच्या पुलात झोपेच्या धुंदीत आयशर कोसळून अपघात, एक जण ठार तर एक जखमी

जालना9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर शहरालगत असलेल्या दुधना नदीच्या पुलावरून आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास झोपेच्या धुंदीत जालन्याहून औरंगाबाद जाणाऱ्या आयशर पुलाच्या मध्यभागी कोसळल्याने गाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सदर घटना पहाटे 5 ते 5:30 दरम्यान घडली. नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यास मदतीस स्थानिक नागरिक धावत आले. माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली या दरम्यान अपघातात अडकलेले दोघे जिवाच्या आकांताने जीव वाचण्यासाठी मदतीची याचना करीत होते. परंतु अशयर पुलाच्या मध्यभागी दोन्ही भिंतीत आडकल्याने निघणे कठीण झाले होते.

अखेर सकाळी 11: 00 बचावाला यश आले, पण त्यात दोघांपैकी एक जनाचा दबून मृत्यू तर दुसरा जबर जखमी अवस्थेत आढळून आला. चांद बेग कडू बेग असे मृतकाचे नाव आहे तर वाहेद बेग हा मृतकाचा मुलगा असून गंभीर जखमी असल्याने जालना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...