आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:कलगाव शिवारामध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत एक जण ठार एक जण गंभीर जखमी

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर कलगांव शिवारात  भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १९) दुपारी घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील पंढरी संभाजी वसू (२२) हा त्याचे मित्रासह दुचाकी वाहनावर सिरसम येथून हिंगोली कडे येत होता. यावेळी कलगाव शिवारामध्ये एका ट्रकने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातामध्ये पंढरी वसू ट्रकच्या चाका खाली आले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे जमादार एस. पी. सांगळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.तसेच जखमींला उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी उशिरापर्यंत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. तर ट्रक चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे सूत्रांनी सांगितले.