आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अपघातात एक ठार, दोघे गंभीर, ट्रॅक्टरमालकाचा घटनास्थळीच मृत्यू

पाचोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅक्टरमधील इंधन संपल्याने पेट्रोल पंपावर कॅन घेऊन दुचाकीवर तिघे जण जात असताना वाटेतच भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात ट्रॅक्टरमालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेले दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले.

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील श्रीक्षेत्र कचनेर (जि.औरंगाबाद) फाट्यानजीक पेपर मिलसमोर सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. भरत सदाशिव सोनवणे (३४, रा.चित्तेपिंपळगाव) असे मृताचे नाव आहे. परमेश्वर सोनवणे (३६), अर्जुन माणिकराव सोनवणे (१९) हे दोघे गंभीर जखमी झाले.

चित्तेपिंपळगाव येथील भरत सोनवणे यांचा वाळूचा व्यवसाय असून त्यांच्याकडे दोन हायवा ट्रक आहेत. नांगरणीचे काम सुरू असताना ट्रॅक्टरमधील डिझेल संपल्याने भरत सोनवणे यांनी कॅन सोबत घेत दुचाकीवर अन्य दोघांना सोबत घेत तिघे जात होते. कचनेर फाट्याजवळील पेपर मिलसमोर पेट्रोल पंपाकडे वळण घेत असताना दुचाकीला भरधाव कंटेनरने जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील भरत सोनवणे यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

बातम्या आणखी आहेत...