आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात गेल्या ४ दशकांत आयोजित १५ प्रमुख राजकीय यात्रांपैकी गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेने राज्यातील काँग्रेस सरकार उलथले. उर्वरित १४ यात्रांमुळे संबंधित नेत्यांचे करिअर स्थिरस्थावर होऊन ओळख मिळाली. देवेंद्र फडणवीस यांना महाजनादेश यात्रेनेे मते तर मिळाली, पण सत्ता गमवावी लागली. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोमवारी राज्यात दाखल झाली. १३ दिवस ती महाराष्ट्रातून जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय यात्रांचा हा आढावा.
यात्रा आणि राजकारण : ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधणे, समस्या जाणून घेण्यासाठी यात्रा असल्याचा होत असतो दावा
शिवसंवाद यात्रा : जुलै २०२२
नेतृत्व : आदित्य ठाकरे
शिवसेनेत फूट पडल्यावर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी आदित्य ठाकरे यांनी ८ जुलै २०२२ पासून निष्ठा यात्रा व २१ जुलैपासून शिवसंवाद यात्रा सुरू केली.
महाजनादेश यात्रा : भाजप, २०१९
नेतृत्व : देवेंद्र फडणवीस
१ ऑगस्ट २०१९ ला अमरावतीच्या मोझरीपासून सुरुवात. २ टप्प्यांत ३० जिल्ह्यांतील १५० विधानसभा मतदारसंघांतून ४२३१ किमी अंतर.
फळ : आमदार घटले. सरकारही गेले.
जनआशीर्वाद यात्रा : शिवसेना, २०१९
नेतृत्व : आदित्य ठाकरे
१८ जुलै २०१९ पासून जळगावमध्ये सुरुवात. सहा टप्प्यांत सुुुमारे ४ हजार किमीचा प्रवास. आदित्य यांना "लाँच' करण्याचा प्रयत्न. तरुणाई मुख्य टार्गेट.
फळ : आमदार घटले. सरकार आले.
माउली संवाद यात्रा : शिवसेना, १९
नेतृत्व : आदेश बांदेकर
३ ऑगस्ट २०१९ राेजी पालघर जिल्ह्यातून सुरुवात. महिला वर्गाला सेनेसोबत जोडण्याचा प्रयत्न.
फळ : आमदार घटले. सरकार आले
शिवस्वराज्य यात्रा : राष्ट्रवादी, २०१९
नेतृत्व : खा. अमोल कोल्हे, उदयनराजे भोसले
६ ऑगस्ट १९ ला शिवनेरी किल्ल्यातून सुरुवात. महाजनादेश व जनआशीर्वाद यात्रेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न.
फळ : आमदार वाढले
पोलखाेल यात्रा : काँग्रेस, २०१९
नेतृत्व : नाना पटोले
२५ ऑगस्ट २०१९ पासून भाजप-शिवसेना सरकारमधील घोटाळे उघडकीस आणण्यासाठी.
फळ : आमदार वाढले
स्वाभिमानी : आक्रोश यात्रा, २०१९
नेतृत्व : राजू शेट्टी
११ ऑगस्ट २०१९ रोजी सुरुवात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच आपण महाविकास आघाडीसोबत नाही, हे सांगण्यासाठी.
फळ : फायदा नाही
जनसंघर्ष यात्रा : काँग्रेस, २०१८
नेतृत्व : अशोक चव्हाण
३१ ऑगस्ट २०१८ पासून काेल्हापूरहून काँग्रेसच्या जनसंघर्षाला सुरुवात. युती सरकारविरुद्ध जनमत तयार करणे.
फळ : २०१९ मध्ये सत्तेत
प्रत्यक्षात : सत्तेचा सोपान काबीज करण्याचे असते एकमेव उद्दिष्ट
पंकजा मुंडे : संघर्ष यात्रा, २०१४
गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनानंतर सिंदखेडराजा ते चौंडी अशी १४ दिवसांची यात्रा. २१ जिल्हे, ७९ मतदारसंघांतून गेली.
फळ : इमेज बिल्डिंग. ग्रामविकास मंत्रिपद.
दिवाकर रावते : कापूस दिंडी, २०११
कापसाला ६००० भावासाठी विदर्भातील ५ जिल्ह्यांत प्रवास. शेतकरी आत्महत्येवर "सांत्वना दिंडी' ही काढली.
फळ : इमेज बिल्डिंग
गोपीनाथ मुंडे : संघर्ष यात्रा, १९९५
शिवनेरी ते शिवतीर्थ संघर्ष यात्रा. तत्कालीन शरद पवार सरकारविरुद्ध वणवा पेटला. पवारांचे दाऊदसोबत संबंधांचा आरोप.
फळ : १९९५ मध्ये युतीचे सरकार. मुंडे उपमुख्यमंत्री.
पांडुरंग फुंडकर : कापूस यात्रा, १९८०
कापसाच्या प्रश्नावर "खामगाव ते नागपूरचे विधान भवन ही ३५० किलोमीटरची पायी यात्रा. फळ : फुंडकर यांची शेतकरी नेते म्हणून इमेज बिल्डिंग
शरद पवार : शेतकरी दिंडी, १९८०
इंदिरा गांधींनी पवारांच्या नेतृत्वातील ‘पुलोद' सरकार बरखास्त केल्यावर अनेक आमदार सोडून गेले. जळगाव ते नागपूर दिंडी. फळ : पवारांची “लोकनेता' म्हणून ओळख. पवारांच्या एस. काँग्रेसचे ५६ आमदार विजयी. मुख्यमंत्रिपद मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.