आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा:सुरक्षा रक्षक खूनप्रकरणी पाचपैकी एकास जन्मठेप, चौघांना सक्तमजुरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरक्षा रक्षकाचा खून केल्याप्रकरणात पाचपैकी एका आरोपीला जन्मठेप तर उर्वरित चौघांना सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली १६ हजार रुपयांच्या ‍ दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायाधीश व्ही. बी. पारगावकर यांनी ठोठावली.प्रकरणात मृत रिझवान खान रशीद खान (३६) यांचा लहान भाऊ मेहराज खान रशीद खान (२७, रा. उस्मानपुरा) यांनी फिर्याद दिली होती. सिल्लेखाना येथील अब्दुल गनी कुरेशी यांच्या मालकीच्या नूर एंटरप्रायझेस कंपनीत मृत रिझवान व मेहराज सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. या कंपनीच्या मालकी हक्कावरून कुरेशी व भागीदार साजिद कुरेशी, खालेद अबू तुराब यांच्यात वाद सुरू आहे.

दरम्यान, १ मे २०१९ रोजी रात्री दोघे भाऊ कामावर असताना वरील पाचही आरोपी तेथे आले. मृत व फिर्यादीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी खालेदने रिझवानच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खून केला, तर मेहराजवरही आरोपींनी प्राणघातक हल्ला केला. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तत्कालीन उपनिरीक्षक ए.जी. शिंदे यांनी न्य‍ायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे आणि सहायक लोकाभियोक्ता बी.एन. आढावे यांनी २२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्याया युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून खालेद अबू तुराब (३९) याला भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप आणि विविध कलमांखाली ९ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपी अब्दुल माजित अब्दुल बारी कुरेशी ऊर्फ कैसर कुरेशी याला भादंवि कलम ३२४ अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली साडेपाच हजारांच्या दंडाची शिक्षा तर आरोपी शेख अब्दुल माजिद शेख अब्दुल हमीद, आरोपी आवेज खान दोस्त मोहंमद खान आणि आदिल खान नादेर खान यांना भादंवि कलम १४७ अन्व‍ये एक वर्ष सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली दीड हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

बातम्या आणखी आहेत...