आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:परळी ते गंगाखेड रोडवर विचित्र अपघातात एक जण जागीच ठार तर एक जखमी

परळीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

परळी ते गंगाखेड रस्त्यावर एका विचित्र अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाला असल्याची घटना आज (दि.04) एप्रिल रोजी 2.30 वाजता घडली आहे.

शहरापासून जवळच असलेल्या परळी ते गंगाखेड रस्त्यावर औष्णिक विद्युत केंद्राच्या मिनी स्टोअर समोर सुनील सुभाष उदावंत हा मित्र उमेश विठ्ठल टाक याच्या सोभत परळीकडे येत असताना दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या व गंगाखेडहून येणारा दुचाकीस्वार सुनील सुभाष उदावंत (वय ३५) हा बाजूने जाणाऱ्या राखेच्या टँकरखाली गेल्याने या दुचाकीस्वाराच्या अक्षरशः चिंधड्या चिंधड्या झाल्या होत्या. अपघातस्थळी मासांचा खच पडलेला दिसून येत होता. दुचाकीस्वारासोबत असलेला उमेश विठ्ठल टाक हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात संभाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून दुचाकी व राखेचे टँकर ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...