आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडी सुरू करण्याचा निर्णय:कोल्हापूर-औरंगाबाद-कोल्हापूर विशेष गाडीची एक फेरी

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रवाशांच्या सुविधांकरिता मध्य रेल्वेने २६ जानेवारी राेजी कोल्हापूर ते औरंगाबाद विशेष गाडी आणि २७ जानेवारीला औरंगाबाद ते कोल्हापूर विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला अाहे. कोल्हापूर येथून २६ जानेवारीला दुपारी १२:४५ वाजता निघून औरंगाबादला २७ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासाला ही रेल्वे २७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता औरंगाबादेतून निघून रात्री १२ वाजेनंतर कोल्हापूरला पोहोचेल. कोल्हापूर येथून निघाल्यानंतर विशेष रेल्वे पंढरपूर-लातूर-परळी-परभणी-जालना मार्गे औरंगाबादला पोहोचेल. याच मार्गाने परत कोल्हापूरला जाईल. याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेच्या करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...