आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानबाद:‘एक रुपयाचा कढीपत्ता, राज्य सरकार बेपत्ता’आशा स्वयंसेविकांचे भरपावसात धरणे आंदोलन

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

“एक रुपयाचा कढीपत्ता, राज्य शासन बेपत्ता’ अशा घोषणा देत विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर सोमवारी भरपावसात जोरदार धरणे आंदोलन केले. हर घर दस्तक योजनेतून आशांना एक तर गट प्रवर्तकांना दीड हजार मोबदला मान्य होईपर्यंत कामावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

जिल्ह्यात कार्यरत असलेल्या आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तकांना हर घर दस्तक २ या मोहीमे अंतर्गत दररोज प्रत्येक घरातील कुंटुबाच्या सदस्याचे विना मोबदला सर्वेक्षणाचे १ जून ते ३१ जुलैदरम्यान करण्याचे काम सांगण्यात आले आहे. कोविड काळात हर घर दस्तक या मोहिमे अंतर्गत आशा व गटप्रवर्तकांना सर्व्हेचे काम लावण्यात आले होते, त्याचा त्यांना कोणताही मोबदला आजपर्यंत देण्यात आला नाही. आशा स्वयंसेविकांची नेमणूक कामावर आधारित मोबदला या तत्त्वानुसार करण्यात आलेली आहे. कोविडच्या कामासाठी केंद्र शासनाकडून मिळणारा एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता एप्रिल २०२२ पासून देण्याबाबत अधिकृत शासन आदेश निर्गमित करण्यात आल्याचे दिसून येत नसल्याचे म्हणत आंदोलन करण्यात आले.

आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी जि.प. मुख्यालयासमोर पावसात आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...