आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:रांजणगावात किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत चाकूने वार; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांजणगावमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या हाणामारीत चाकूचे वार केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रभाकर चोरमले (वय 49) असे मृताचे नाव आहे. तर इतर तिघांवर अजूनही घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वादाचे कारण काय?

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, प्रभाकर चोरमले हे पत्नी मनीषा दोन मुल संकेत व नितीन यांच्यासह नर्सरी कॉलनी रांजणगाव येथे इस्लाम बेग यांच्या वाड्यात किरायाने राहतात. वाळूज औद्योगिक परिसरातील अडव्हान्टेज या कंपनीत सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. याच वाड्यात इतरही भाडेकरू राहतात. वाड्यात पाण्यासाठी सर्वांमध्ये एक सामाईक नळ आहे. त्यावरूनच सर्व भाडेकरू पाणी घेतात. याच नळावर पाणी भरण्याच्या करणातून 4 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या भाडेकरू लक्ष्मीबाई भाऊसाहेब दळवी हिने मनीषा यांच्याशी वाद घातला होता.

चाकूने केले वार

याच वादातून लक्ष्मीबाईचा पती भाऊसाहेब दामोदर दळवी, मुलगा योगेश व महेश दळवी या चौघांनी रात्री 10 वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या चोरमले यांच्या अंगणात उभे राहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पुढे योगेश दळवीने वडील, भाऊ व आईच्या मदतीने संकेत त्याचे वडील प्रभाकर भाऊ नितीन व आई मनीषा या चौघांवर चाकूने जबरी वार करत त्यांना गंभीर जखमी केले. यात प्रभाकर यांच्या पोटावर दोन वार केले व डोक्याच्या मागील बाजूस दगड मारल्याने ते जागीच बेशुद्ध होऊन पडले. तेवढ्यावर न थांबता दळवी कुटुंबांनी मनीषा यांना सुद्धा चाकूने भोसकून जखमी केले. पोलिस ठाण्यात धाव घेऊन त्यांनी चोरमले कुटुंबावर परस्परविरोधी गुन्हा दाखल केला.

शेकडो लोक बघत होते

चौघांवर जीवघेणा हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सदरील गुन्ह्यात वाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गौतम वावळे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...