आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे नुकसान:38 शाळांमध्ये एकशिक्षकी कारभार ; दुसरे शिक्षक इतर शासकीय कामासाठी प्रतिनियुक्तीवर

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत महिनाभरातून एक-दोन वेळा विद्यार्थी मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडून बसण्याचा प्रकार समाेर येत आहे. या वेळी आम्हाला शाळेत शिकवण्यासाठी शिक्षक द्या, अशी मागणी करत विद्यार्थी आंदोलन करताना दिसतात. परंतु, दुसरीकडे विद्यार्थी गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांवरही दबाव असतो. मात्र, त्यांच्यावर कधी मतदार नोंदणी, टपाली कामे, केंद्रप्रमुखांनी बोलावल्यावर मीटिंगसाठी जाणे आदी कारणामुळे शाळेतील वर्ग शिक्षकाविनाच भरतो. त्यामुळे एका शिक्षकावरच दोन-तीन वर्गांची जबाबदारी येऊन पडल्याने विद्यार्थी गुणवत्ता कशी टिकेल, असा प्रश्न उपस्थित हाेताे. औरंगाबाद जिल्ह्यात १,०१३ द्विशिक्षकी शाळा आहेत. त्यापैकी १३२ औरंगाबादेत शाळा आहेत. या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक रजेवर गेल्यास एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी येते. सध्या ३८ शिक्षक प्रतिनियुक्तीवर दुसऱ्या कामावर नियुक्त करण्यात आले आहेत. अशा शाळांमध्ये एकाच शिक्षकावर सगळा भार येत असून तिथे गुणवत्ता राखायची तरी कशी, असा प्रश्न उपस्थित हाेताे.

प्रतिनियुक्त शिक्षकांना परत बाेलावले
प्रतिनियुक्तीवर गेलेले ३८ शिक्षकांना परत बोलावण्यात आले आहे. ज्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षक आहेत ते द्विशिक्षकी किंवा जिथे एकच शिक्षक आहे त्या ठिकाणी पाठवले जातील. त्यामुळे त्या शाळेतील अडचण दूर हाेईल. सध्या एक शिक्षकी एकही शाळा नाही.
-जयश्री चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी

आरटीईचे नियम पायदळी
आरटीईच्या नियमानुसार विद्यार्थ्यांमागे शिक्षक हा नियमच पायदळी तुडवला जात आहे. याचे कारण द्विशिक्षकी शाळा या वाड्या-वस्त्या आणि दुर्गम भागात अधिक आहेत. एक जरी शिक्षक रजेवर गेला तर अडचण येते. टपाली, मतदार नोंदणी कामे आहेत., मीटिंगसाठी दोन-तीन वेळा जावे लागते. मग विद्यार्थी टिकवण्यासाठी शिक्षकही शाळेत टिकले पाहिजेत.
-राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ

बातम्या आणखी आहेत...