आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार:घामाची किंमत ओळखून मेहनत करतो त्याला यश मिळते :  प्रा. गायकवाड

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

“जीवनात कष्टाशिवाय पर्याय नाही. यशाला शॉर्टकट नसतो. घामाची किंमत ओळखून मेहनत करतो त्याला यश मिळते,’ असे मत प्रा. शिवाजी गायकवाड यांनी व्यक्त केले. मिटमिटा येथील भारत करिअर अकॅडमीतर्फे सैन्य दलात व एसबीआय बँकेत भरती झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक अशोक आमले, जिल्हा वकील संघाचे माजी सचिव अशोक मुळे, माजी सैनिक परशुराम मुघले, दीपक रोकडे, प्रा. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते १७ अग्निवीरांचा सत्कार करण्यात आला. भारत करिअर अकॅडमीचे संचालक बाळासाहेब घुगे, अमोल कवडे, समाधान सुरडकर, अण्णासाहेब चव्हाण, दिगंबर भोजने, शंकर जाधव, शुभम बोडखे यांची उपस्थिती होती. अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला-मुली, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षणाची सोय आहे. संपर्क साधण्याचे आवाहन घुगे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...