आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आष्टीत सलग तिस-या दिवशी बिबट्याचा हल्ला सुरुच:सकाळी एका महिलेला जखमी केल्यानंतर सायंकाळी दुसऱ्या महिलेचा घेतला जीव

बीड2 महिन्यांपूर्वीलेखक: गणेश दळवी
  • कॉपी लिंक
  • अनेक दिवसांपासून बिबट्या वनविभागाच्या पथकाला चकवा देत आहे

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरुच असून, आज(दि.29)सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा जीव गेला आहे. यापूर्वी आज सकाळीच, आष्टीतील बोराडे वस्तीवरील महिलेला बिबट्याने जखमी केले होते. त्या महिलेवर अहमदनगरमध्ये उपचार सुरू असतानाच, त्याच भागात आज सांयकाळी सहाच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याने 55 वर्षीय महिलेवर हल्ला केला. यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सकाळी झालेल्या पारगांव जोगेश्वरी परिसरातच वनविभागाचे पथक असून सुध्दा ही दुसरी घटना घडली याबद्दल वनविभाच्या पथकावर संशय व्यक्त होत आहे.

आष्टी तालुक्यात गेल्या चार दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. आज सकाळी शालन शहाजी भोसले या 61 वर्षीय महिलेवर बोरोडे वस्ती परिसरात बिबट्याने हल्ला केला होता. पण, प्रसंगवधाने तिची बिबट्याच्या जबड्यातून सुटका झाली. याठिकाणी लगेचच वनविभागाने पथके पाठवून पिंजराही लावला. पण, आज सायंकाळी 6 च्या सुमारास याच परिसरातील सुरेखा निळकंठ बळे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, मृतदेहावर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन राञी उशीरा तिचावर अत्यंसंस्कार करण्यात आले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser