आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालहान भावासोबत रस्त्याने जाणाऱ्या युवतीचा हात पकडून तिचे चुंबन घेणाऱ्या शेख अनीस शेख हबीब (३५, रा. गारखेडा) याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. ती जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. रामगडिया यांनी कायम ठेवली. १४ ऑगस्ट २०१२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास १८ वर्षीय तरुणी लहान भावासह उल्कानगरी येथून हनुमाननगरकडे जात होती. मनपा कार्यालयासमोर अचानक आरोपी आला व त्याने युवतीचा रस्ता अडवला. तिचे दोन्ही हात पकडून तिच्या गालावर चुंबन घेतले. घाबरलेल्या युवतीने आरडाओरडा केला. तेथे जमलेल्या नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ६ जून २०१८ रोजी आरोपीला कलम ३५४ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. याविरोधात आरोपीने सत्र न्यायालयात अपील केले होते. मात्र तिथेही शिक्षा कायम ठेवली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.