आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित कलेतून आवाहन:कांदा उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या; प्राण्यांचा छळ थांबवा, वायफायप्रमाणे रक्तही शेअर करा

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याचे भाव कोलमडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ज्याप्रमाणे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा प्रचंड गाजतो आहे. अगदी प्रमाणेच चित्रे आणि अप्लाइड आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या कलाकृतींद्वारे त्यावर प्रखर भाष्य केले आहे. निमित्त होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ललित कला विभागाच्या ‘अंतरंग’ या वार्षिक कला प्रदर्शनाचे. २१ मार्चपर्यंत प्रदर्शन सुरू राहिल. विभागाच्या शंभर विद्यार्थ्यांनी जवळपास ६०० कलाकृती प्रदर्शनात मांडल्या आहेत. त्यातून सामाजिक आशय प्रकट झाला आहे.

अनंत डावखर या विद्यार्थ्याने रक्तदान श्रेष्ठ दान असल्याचे कलाकृतीद्वारे सांगितले आहे. ‘आपण वाय-फाय शेअर करतो मग, रक्त करायला काय हरकत आहे..?’ असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. ललित कला विभागाच्या दर्शनी भागात एमएफएच्या अंकुश ढोले आणि बीएफए ब्रीज कोर्सची सोनल बोरा हिने ऱ्हदय पिळवटून टाकणारी कलाकृती मांडली आहे. कांद्याची झालेली नासाडी अन् त्याच कांद्यांवर शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा हा प्रतिकात्मक देखावा आहे. आत्महत्येनंतर पत्नी व कुटुंबियांची होणारी परवडही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

विभागप्रमुख डॉ. शिरीष आंबेकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण काम करत आपल्या प्रकट केल्या आहेत. सर्वांनी प्रदर्शनाला भेट द्यावी.’ सांगली येथील प्रसिध्द चित्रकार प्रा. सत्यजित वरेकर यांच्या हस्ते शनिवारी ( १८ मार्च) सकाळी ११ वाजता उद्घाटन झाले. डॉ. गजानन पेहरेकर यांनी पारितोषिकांचे वाचन केले. प्रा. वि. दा. मस्के यांनी सूत्रसंचालन केले प्रा. नीता वाकोडे यांनी आभार मानले. रवींद्र काळे, डॉ. रूपाली वाघ, निखिल राजवर्धन, श्रीकांत पुरी आदींची उपस्थिती हाेती.

प्रदर्शनातील सोळा गुणवंतांच्या कलाकृतींना पारितोषिक १६ गुणवंतांची पारितोषिकासाठी निवड केली. यात बीएफए ब्रीज कोर्स उपयोजित कला : वेदांती गायकवाड, निशांत वाणी, भाग्यश्री देशमुख, कोमल अभंग, बीएफए ब्रीज कोर्स पेंटींग : सोनल बोरा, खान सैफ नईम खान, साक्षी कासार, सुभाष वाळवी, एमएफए उपयोजित कला : सरण्या प्रभाकरण, सौरभ शितभाते, रजनी गाडेकर, श्रध्दा कन्नम, एमएफए पेंटींग : अभिजय म्हस्के, कबीरानंद सर्वे, योगेश औताडे, श्रध्दा कोतकर आदी.

बातम्या आणखी आहेत...