आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ दांपत्यांचाही सन्मान:अग्रवाल सभेच्या स्नेहमिलनात कांदा-लसूणविना जेवणाचा मेनू

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्रवाल सभेच्या स्नेहमिलनात या वर्षी कांदा-लसूण याचा वापर न करता जेवणाचा मेनू तयार करण्यात आलेला होता. यासोबतच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या युवक-युवतींसह ५० ते ६५ च्या वरील जोडप्यांचा सत्कार करून उत्साहात स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला. अग्रसेन भवनात नुकताच अग्रवाल सभेच्या वतीने दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रम झाला. या वेळी अध्यक्ष सत्यनारायण अग्रवाल, महिला समितीच्या अध्यक्षा कविता बन्सल, मनीषा भारुका, अनुप अग्रवाल, मुकेश अग्रवाल, निकिता अग्रवाल, शीतल अग्रवाल, विनोद अग्रवाल, आशिष अग्रवाल, राजकुमार टिबडीवाला, निधी अग्रवाल उपस्थित होते.

क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्य मिळवलेल्या ७० युवकांचा गाैरव गेल्या वर्षी कोविडमुळे ३५० समाजबांधवांच्या उपस्थितीत स्नेहमिलन पार पडले. यंदा ६०० पेक्षा जास्त समाजबांधव उपस्थित होते. यंदा कांदा-लसूण याचा वापर न करता जेवण देण्यात आले. यात मुगाची भाजी, कढी-भात तसेच पोळी, मिश्र भाजी तयार केली होती. सचिव राजेश टकसाली म्हणाले की, ज्या पद्धतीने देवाला नैवेद्य दाखवला जातो त्या पद्धतीने या वर्षी जेवण बनवण्यात आले होते. हेरिटेज इंडियातील, डान्स दिवाणेमधील विजेते, क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवलेल्या ७० युवकांना गौरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...