आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:मराठवाड्यातील 132 आयटीआयच्या 19 हजार 244 जागांसाठी उद्यापासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लांबलेली औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने उद्या एक ऑगस्ट पासून राबवली जात आहे मराठवाडा विभागातील १३२ आयटीआय मधील १९ हजार २४४ जागांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे यामध्ये ५० खाजगी आयटीआयाचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय च्या वतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. १ ते १४ ऑगस्ट यादरम्यान विद्यार्थ्यांना आपल्या अपेक्षित ट्रेड साठी प्रवेश अर्ज ऑनलाइन भरता येणार आहे. मराठवाडा विभागातील शासकीय ८२ आणि खाजगी पन्नास आयटीआय मिळून अशा एकूण १३२ आयटीआयमध्ये १९ हजार २४४ जागा भरल्या जाणार आहेत. सर्वाधिक नांदेड जिल्ह्यामध्ये चारशे जागा भरल्या जाणार आहेत, नांदेड पाठोपाठ लातूर जिल्ह्यामध्ये अठरा आयटीआयच्या ३ हजार २६८ जागा भरल्या जाणार आहेत अन्य जिल्ह्यात परभणी - १३ आयटीआयत २ हजार ५६ जागा, हिंगोली सात आयटीआय ८१२ जागा धाराशिव सतरा आयटीआय २ हजार १६४ जागा, बीड चोवीस आयटीआयमध्ये ३ हजार ७६ जागा भरल्या जाणार आहेत. मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद मध्ये ११ शासकीयसह ६ खाजगी अशा १७ आयटीआय मध्ये २ हजार ३४० जागा भरल्या जाणार आहेत तसेच जालना मध्ये १२ आयटीआय १ हजार ५२८ जागा भरल्या जाणार आहेत. दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शासकीय आणि खाजगी आयटीआयची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे यासाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित केला जाणार आहे, यासाठी उद्या शनिवार दि. १ ऑगस्ट पासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असून ही प्रक्रिया १४ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे गुणवत्ता यादीबाबत अक्षेप -हरकत व अर्जातील माहिती बदलणे यासाठी दोन दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे १६ आणि १७ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांना बदल करता येऊ शकतो. अंतिम गुणवत्ता यादी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाणार आहे प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया चार टप्प्यात राबवली जाणार आहे पहिली प्रवेश फेरी २० ऑगस्ट पासून सुरू होत असून दुसरी प्रवेश फेरी २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान राबवली जाणार आहे तिसरी प्रवेश प्रक्रिया तीन ते चार सप्टेंबर या कालावधीत आणि चौथी ८ ते १२ सप्टेंबर सकाळी नऊ ते पाच या वेळेत राबवली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेपासून काही विद्यार्थी वंचित राहू शकतात अशा विद्यार्थ्यांसाठी नव्याने अर्ज भरण्यासाठी सवलत म्हणून १ ते १९ सप्टेंबर असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे, त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी घेतली जाणार आहे शिवाय खाजगी संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया १६ ऑगस्ट रोजी राबवली जाणार आहे अशी माहिती संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. असे आहे वेळापत्रक - - १ ते १४ ऑगस्ट अर्ज प्रक्रिया - १६ ऑगस्ट रोजी प्रथम गुणवत्ता यादी - १६ आणि १७ ऑगस्ट दरम्यान अर्जात बदल करता येईल - १८ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहिर होईल