आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणाच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविली जात असून यासाठी मतदार नोंदणी केली जात आहे, या मतदार नोंदणीस आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिसभा निवडणुकीसाठी आता 5 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. तर 20 जून या शेवटच्या मुदतीपर्यंत 28 हजार 707 मतदारांची नोंदणी झाली आहे.
विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यासाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी 20 जून ही अंतिम तारिख आणि हार्ड कॉपी सादार करण्याची मुदत 27 जून निश्चित करण्यात आली होती. निर्धारित कालावधीत सर्वाधिक 23 हजार 933 अर्ज पदवीधरचे आले आहेत. शिवाय विभाग प्रमुख -1581, व्यवस्थापन - 212, प्राचार्य-117, अध्यापक-2698 आणि विद्यापीठ अध्यापकांचे 166 असे एकूण 28 हजार 707 अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक समितीचे अध्यक्ष डॉ. एस. टी. गायकवाड यांनी दिली.
निर्धारित कालावधीत मतदार नोंदणी पुर्ण होण्याची शक्यता नाही, म्हणून मतदार नोंदणीस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ संघटक डॉ. तुकाराम सराफ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कुलगुरू प्रा. प्रमोद येवले यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती. याची दखल घेत पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे,यासंबधीचे परिपत्रक कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी जारी केले आहे. अधिसभा निवडणुकीसाठी आता ५ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार असून हार्ड कॉपी ही 12 जुलैपर्यंत दाखल करता येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
असे आहेत शेवटच्या मुदतीपर्यंत प्राप्त झालेले अर्ज
प्राधिकरण अर्ज दाखल
पदवीधर -23,933
विभागप्रमुख -1581
व्यवस्थापन -212
प्राचार्य -117
अध्यापक -2698
विद्यापीठ अध्यापक -166
एकूण अर्ज -28,707
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.