आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

‘नेट’के शिक्षण:राज्यात आता पूर्व प्राथमिकसह इयत्ता पहिली, दुसरीच्याही शाळा ऑनलाइन; सोमवार ते शुक्रवार अर्ध्या तासाचे सत्र

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारकडून नव्याने ऑनलाइन वर्गांचे वेळापत्रक

कोरोनामुळे शाळा प्रत्यक्षपणे उघडणे शक्य नसल्याने राज्य सरकारने नर्सरी, इयत्ता पहिली व दुसरीला वगळून इतर वर्गांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचे निर्देश दिले होते. आता शासनाने नव्याने ऑनलाइन शिक्षणाचे वेळापत्रक जारी केले आहे. त्यात पूर्व प्राथमिक, इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठीही सोमवार ते शुक्रवार असे ५ दिवस अर्ध्या तासांची सत्रे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठीही अर्ध्या तासाचे सत्र ठेवले आहे. यामुळे राज्यात आता प्री-प्रायमरी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप प्रत्यक्ष शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करत स्थानिक परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व शाळा समितीवर सोपवला होता. त्याचबरोबर पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या अंदाजे तारखाही शिक्षण विभागाकडून शाळांना देत ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

१५ मिनिटे पालकांशी संवादही साधला जाणार

> पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांचे सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज अर्धा तास ऑनलाइन वर्ग घेऊन पालकांशी संवाद साधून मार्गदर्शन करायचे आहे.

> नवीन आदेशानुसार, ऑनलाइन वर्गांच्या वेळापत्रकात पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार अर्ध्या तासाची दोन सत्रे ठेवण्यात आली आहेत.

> यात १५ मिनिटे पालकांशी संवाद व १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण देण्यात येईल. त्यामुळे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचेही ऑनलाइन वर्ग भरतील.

तिसरी ते आठवी २ सत्रे, नववी ते बारावी ४ सत्रे : 

तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शुक्रवारपर्यंत प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांची दोन सत्रे असतील. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४५ मिनिटांची चार सत्रे ऑनलाइन घेता येतील.