आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:सलूनचालकासह पत्नीची 60 हजारांची ऑनलाइन फसवणूक; सिडको पोलिस ठाण्यात 7 मार्च रोजी गुन्हा दाखल

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

राजू वसंत शेजवळ (३७, रा. म्हाडा कॉलनी) सलून व्यावसायिक आहेत. शेजवळ व त्यांच्या पत्नीची एसबीआय बँकेमध्ये दाेन वेगवेगळी खाती आहेत. ही दोन्ही खाती शेजवळच्या मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पैशाची देवाण-घेवाण करणाऱ्या अॅपला जोडलेली आहेत. २ मे २०२१ रोजी शेजवळ यांनी मावसभाऊ राजू शिवनाथ शेजूळ (रा. चिकलठाणा) यांना दीड हजार रुपये ऑनलाइन पाठवले होते. परंतु, दोन दिवस झाले तरी ते पैसे त्याला मिळाले नाहीत. त्यामुळे ५ मे २०२१ रोजी राजू शेजवळने गुगलवरून संबंधित अॅपचा कस्टमर केअरचा क्रमांक काढून फोन केला.

मात्र, हा फोन कस्टमर केअरला न जाता तो थेट सायबर भामट्याला गेला. भामट्याने राजूकडून माहिती घेत पैसे रिफंड मिळतील, अशी बतावणी करून मोबाइलवर एक ओटीपी येईल, तो देण्यास भाग पाडले. ओटीपी मिळताच भामट्याने ३१ हजार ८०५ रुपये काढून घेतले. त्यावर राजूने पुन्हा फोन लावला. पण, भामट्याने चुकून झाले, तुम्हाला दुसरा ओटीपी येईल, तो द्या, दोन्ही पैसे रिफंड होतील अशी पुन्हा थाप मारत त्यांच्या पत्नीच्या खात्यातील २८ हजार ९२३ रुपये काढून घेतले. त्यानंतर सायबर भामट्याने मोबाइल बंद करून ठेवला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेजवळने व्यवहार थांबवण्यासाठी बँकेत व सायबर पोलिसांकडे तक्रार केली, पण त्याचा उपयोग झाला नाही.

बातम्या आणखी आहेत...