आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिषद:केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते आज ऑनलाइन उद्घाटन, 5 कुलगुरूंची हजेरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गुरुवारी (२२ डिसेंबर) ७३ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेचे उद्घाटन होणार आहे. ‘भारताची फाइव्ह ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल’ यासह विविध विषयांवर मंथन होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ऑनलाइन उद्घाटन करतील. उद्योजक, प्राध्यापक, विद्यार्थी, विविध कुलगुरूंसह दीड हजार प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

डॉ. येवले म्हणाले, ‘२२ ते २४ डिसेंबरदरम्यान नाट्यगृहासह विविध सभागृहात ७ परिसंवाद होणार आहेत. सहा महिन्यांपासून या परिषदेची तयारी सुरू होती. देशभरातून १,५४७ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. रोजगारनिर्मिती डिजिटल ब्रँडिंग, मानव संसाधन विकास रणनीती, सर्वसमावेशक विकास, मार्केटिंग व आंतरराष्ट्रीय व्यापार आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या वेळी विविध पारितोषिकांचे वितरण व स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल. या परिषदेत ९१२ संशोधनपर लेख प्राप्त झाले आहेत असेही कुलगुरूंनी सांगितले. परिषदेचे सचिव डॉ. वाल्मीक सरवदे म्हणाले, ‘५९२ पेपर्सचे प्रत्यक्ष वाचन होईल.

१ परिसंवाद, २ स्मृती व्याख्याने होतील. या वेळी त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. जी. पी. प्रसेन, इंदूर येथील प्रा. रमेश मंगल ’इंडियन कॉमर्स असोसिएशन’चे सचिव डॉ. पुष्पेंद्र मिश्रा, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, ‘आयसीए’चे माजी उपाध्यक्ष प्रा. मानस पांडेय, कोषाध्यक्ष प्रा. नवल किशोर, संयोजन समिती सचिव डॉ. वाल्मीक सरवदे, विभागप्रमुख डॉ. सय्यद अझरुद्दीन, एमजीएमचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. हरिदास विधाते, डॉ. विलास इप्पर, एस. जी. शिंदे उपस्थित होते.

मराठवाड्यातील अनेक उद्याेजकांची राहणार उपस्थिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होईल. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, उद्योजक श्रीकांत बडवे, इंडियन कॉमर्स असोसिएशनच्या अध्यक्ष तथा भुवनेश्वर येथील किट विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. सस्मिता सामंथा, केरळ विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एच. व्यंकटेशरलू, एमजीएमचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ, प्राचार्य टी. ए. शिवारे आदींची उपस्थिती राहणार आहेत. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. येवले राहतील.

बातम्या आणखी आहेत...