आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ऑनलाइन वटसावित्रीची पूजा :लाॅकडाऊनमुळे पती चीनच्या समुद्रात, पत्नी मुंबईमध्ये; व्हिडिओ कॉलवरून केली दीर्घायुष्यासाठी कामना

औरंगाबादएका महिन्यापूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • ऑक्टोबरपासून प्रवास, आता ऑगस्टमध्ये परतणार; आंतरराष्ट्रीय विमाने बंद असल्याचा फटका

कोराेनाच्या संकटामुळे एका इंजिनिअर पत्नीने वटसावित्री पौर्णिमेनिमित्त चीनच्या समुद्रात अडकलेल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ऑनलाइन कामना केली. मर्चंट नेव्हीमध्ये असलेला पती ऑक्टोबरपासून प्रवासाला निघाला आहे. एप्रिलमध्येच तो भारतात परतणार होता. पण आंतरराष्ट्रीय विमाने बंद असल्याने तो आता ऑगस्टमध्ये भारतात परतेल. कोरोनाचा उगम असलेल्या चीनमध्ये तो सुखरूप राहावा, अशी अपेक्षा तिने व्हिडिओ कॉलवर व्यक्त केली.

येवल्यातील देवयानी खांबेकर यांचा खारघरचे प्रतीक चवाथे यांच्याशी ४ वर्षांपूर्वी विवाह झाला. प्रतीक मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असल्याने वर्षातील बहुतांश काळ जहाजावर जगप्रवासात जातो. अनेकदा देवयानीही त्यांच्यासोबत असते. सध्या प्रतीक चीन-ऑस्ट्रेलिया-चीन शटल जहाजावर आहेत. गेल्या वर्षी दिवाळी संपताच २६ ऑक्टोबरला दोघे विमानाने सिंगापूरला गेले. येथून चीनहून आलेल्या जहाजाने ऑस्ट्रेलियाकडे निघालेे. जहाजावर २० जणांचा स्टाफ आहे. या प्रवासासाठी १८ दिवस लागतात. तीन-चार फेऱ्या झाल्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांना कोरोनाबाबत माहिती मिळाली. यामुळे फेब्रुवारीत देवयानी ऑस्ट्रेलियाहून विमानाने मुंबईत परतल्या आहेत.

व्हिडिओ कॉलवरून केली प्रार्थना

जहाजावर मोबाइल रेंजची समस्या असते. काही भागात नेटवर्क मिळते. पण इंटरनेटसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. यामुळे देवयानी यांनी शुक्रवारी मुंबईत घरातच वडाची पूजा करून वटसावित्री पौर्णिमेचा सण साजरा केला आणि व्हिडिओ कॉलवर पतीच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली. या वेळी प्रतीक तैवानजवळ होते.

विमाने बंद असल्याने प्रवास रखडला;

प्रतीक यांचे कंत्राट एप्रिलपर्यंत असल्याने ते जहाजावर थांबले. पण मार्चनंतर आंतरराष्ट्रीय विमाने बंद झाल्याने भारतात परतण्याचे मार्ग बंद झाले. विमाने नसल्याने त्यांच्या जागी काम करणारे लोक पोहोचू नाही शकले. यामुळे त्यांनी काम सुरू ठेवले. आता ऑगस्टमध्येच ते भारतात परतण्याची शक्यता आहे.

जगावर आेढवलेले कोरोनाचे संकट दूर करो

आम्ही याआधीही गणपती, दिवाळी, दसरा, होळी, गुढीपाडवा असे सण जहाजावर साजरे केले आहेत. कोरोनामुळे मला भारतात परतावे लागले. सध्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे यातून सावरण्याची सर्वांना शक्ती मिळाे. प्रतीक मात्र कोरोनाचा उगम असणाऱ्या चीनमध्ये अडकले आहेत. वटसावित्री जगावरील कोराेनाचे संकट दूर करेल, हीच प्रार्थना आहे. देवयानी खांबेकर-चवाथे, मुंबई

0