आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संध्याकाळी 6-9 वाजेच्या दरम्यान सर्वाधिक 20.2% रस्ते अपघात:पहाटे अवघी 10 टक्के वाहतूक, तरीही 6% अपघात याच वेळेत

महेश जोशी | औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवसाच्या तुलनेत पहाटे रस्त्यांवर १० ते १२% वाहतूक असतानाही झोपेचा अंमल आणि अंधारामुळे २०२१ मध्ये एकूण अपघातांपैकी ५.९% अपघात पहाटे ३ ते ६ दरम्यान झाले. संध्याकाळी ६ ते ९ या तीन तासांत सर्वाधिक २०.२% अपघाताच्या घटना घडल्या. ८३% अपघात अतिवेग आणि ओव्हरटेकमुळे, तर मद्यप्राशन करून वाहने चालवल्याने १.९% अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

एनसीआरबीच्या "अॅक्सिडेंटल डेथ्स अँड सुसाइड्स इन इंडिया २०२१' या वार्षिक अहवालातून ही बाब स्पष्ट झाली. २०२१ मध्ये देशात ४,०३,११६ रस्ते अपघात झाले. यात १,५५,६२२ लोक मृत्युमुखी पडले तर ३,७१,८८४ जखमी झाले. महाराष्ट्रात एकूण २६५९८ रस्ते अपघातांत १३९११ जणांचा मृत्यू झाला. मृतांत दुचाकीस्वार ४४.५%, कारचालक १५.१%, ट्रकचालक ९.४% तर बसचालक ३% होते. ग्रामीण भागात २,४०,७४७ (५९.७%), शहरी भागात १,६२,३६९ (४०.३%) अपघातांची नोंद झाली. पहाटे वाहनांची संख्या कमी असतानाही माेठ्या प्रमाणात अपघात झाल्याचे दिसून आले.

१५ हजार अपघाती मृत्यू सीटबेल्ट न लावल्याने : केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्रालयाच्या “रोड अॅक्सिडेंट्स इन इंडिया-२०२०’ अहवालानुसार, देशात २०२० मध्ये कारमध्ये सीटबेल्ट न लावल्याने ७,८१० चालक व ७३३६ सहप्रवासी असे १५,१४६ जण मृत्युमुखी पडले. १६,६२२ चालक व २२,४८० सहप्रवासी असे ३९,१०२ जण जखमी झाले. अतिवेगाने ९,१५२ जणांचा मृत्यू : राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालानुसार, २०२० मध्ये राज्यात ३१,४८३ रस्ते अपघातांत ११,५६९ जणांचा मृत्यू झाला. २६,१३० अपघात सरळ रस्त्यांवर झाले. यात ९४१४ जणांचा मृत्यू झाला. अतिवेगाने झालेल्या २५,४५९ अपघातांत ९,१५२ जणांचा जीव गेला.

राष्ट्रीय व राज्य महामार्ग ५%, अपघात मात्र ५४% देशात एकूण ६३ लाख ८६,२९७ किमीचे रस्ते आहेत. पैकी १ लाख ३२,५०० (२.१%) किमीचे राष्ट्रीय महामार्ग असून यावर सर्वाधिक १ लाख २२,२०४ (३०.३%) अपघात झाले. यात ५३६१५ जणांचा जीव गेला. १ लाख ८६,५२८ (२.९%) किमीचे राज्य महामार्ग असून यावर ९६,४५१ (२३.९%) अपघात झाले. म्हणजेच एकूण रस्त्यापैकी ५% असणाऱ्या राष्ट्रीय-राज्य महामार्गांवर एकूण ५४% अपघात झाले.

अपघाती मृत्यू व कारणे : अतिवेगाने 87050 बळी 55.7% अतिवेग, मृत्यू 87050 27.5% ओव्हरटेक, मृत्यू 42853 3.5 % खराब हवामान, मृत्यू 5405 1.9 % मद्यप्राशन, मृत्यू 2935 1.3 % खराब वाहन, मृत्यू 2022 9.9 % अन्य कारणे, मृत्यू 15357

बातम्या आणखी आहेत...