आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​औदासीन्य:राज्यात 38% क्षेत्रावरील पिकांचाच उतरवला विमा ; शेतकरी, सरकारने भरला 4210 कोटींचा हप्ता

औरंगाबाद / संतोष देशमुखएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात खरिपाचे सरासरी १४२ लाख ८८, ४१८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यांपैकी १३६ लाख हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, शेतकरी, राज्य व केंद्र सरकारने ४२१०.८४ कोटी रुपये विमा हप्ता भरून ५४ लाख ३४,५५१.९५ हेक्टरवर म्हणजे ३८ टक्के पिकांचाच विमा उतरवला आहे.

हवामान बदलांमुळे कमी दिवसांत, कमी वेळेत कुठे धो धो तर कुठे अत्यल्प पाऊस पडतो. कमी व जास्त पाऊस पिकांसाठी व पूर्ण हंगामासाठी अतिशय हानीकारक ठरतो. यामध्ये होणारे नुकसान प्रचंड असते. याचा थेट परिणाम देशाच्या जीडीपीवर होतो. शेती व शेतकरी तोट्यात जातात. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती होणारे नुकसानीची भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी १३ जानेवारी २०१६ पासून सुरु केली. खरीप पिकांसाठी २ टक्के प्रीमियम भरून पिक विमा उतरवणे आवश्यक आहे. तर जोखीम स्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. मात्र, हवामानातील बदलाच्या नोंद व त्यामुळे झालेले नुकसानीची अचुक नोंद घेतली जात नाही. नुकसान होवूनही भरपाई मिळत नाही. जी काही मिळते ती नाममात्र दिली जाते. त्यामुळे खरीप पेरणी क्षेत्राच्या ३८ टक्केच क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवला गेला.

नुकसान पातळीनुसार विमा
राज्यातील ५४ लाख ३४ हजार हेक्टरवरील पिकांचे ७० टक्क्यांवर नैसर्गिक आपत्ती नुकसान झाले तर २६ हजार २४४.९१ कोटी रुपये विमा संरक्षणातून भरपाई मिळेल. नुकसान पातळी जेवढी कमी तेवढी मिळणारी भरपाई कमी असते. आपत्तीची अचुक नोंद घेऊन झालेले नुकसानीचे सत्य टिपणे देखील महत्त्वाचे आहे. तरच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेल. यामध्येच गडबड केली जाते किंवा होते. असे असले तरी विमा घेण्यात मराठवाडा अव्वल तर विदर्भ दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे नोंदीवरून स्पष्ट होते.

विमा संरक्षणाचा आलेख
कर्जदार ३७५१०१
बिगर कर्जदार ८८२९३६२
एकुण शेतकरी ९२,४०,४६३
शेतकरी ६०९.४२ कोटी
राज्य सरकार १८०२.२४ कोटी
केंद्र सरकार १७९९.१९ कोटी
एकुण ४२१०.८४ कोटी
हेक्टर क्षेत्र ५४,३४,५५१.९५
एकुण विमा २६,२४४.९१ कोटी

बातम्या आणखी आहेत...