आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक गणेशोत्सव:780 पैकी 40 गणेश मंडळांनीच घेतली अधिकृत वीज जोडणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीज जोडणी घ्यावी. मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले होते. त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून शहरातील ७८० पैकी केवळ ४० गणेश मंडळांनीच अधिकृत वीज जोडणी घेतली आहे.

महावितरणकडून गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या १०० युनिटसाठी केवळ ४ रुपये ७१ पैसे प्रति युनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी ८ रुपये ६९ पैसे, ३०१ ते ५०० युनिटसाठी ११ रुपये ७२ पैसे आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३ रुपये २१ पैसे दराने वीजपुरवठा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. अनधिकृत व घरगुती किंवा अन्य मार्गाने वीज न घेता अधिकृत वीज जोडणी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले होते. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.

सध्या पाऊस पडतोय. त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज यंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपातील वीज यंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत ठेवावे. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. त्यामुळे वायरचे जोड काढून टाकावेत असे अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे यांनी सांगितले. यंदा गणेश मंडळांना मोफत परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यासाठी गणेश मंडळांनी पोलिस, मनपाची परवानगी अनिवार्य केली आहे. त्यानुसार शहरातील ७८० गणेश मंडळांनी ३१ ऑगस्टपर्यंत पोलिसांकडून तर मनपाकडून २६० गणेश मंडळांनी परवानगी घेतली.

बातम्या आणखी आहेत...