आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्यातील आठ नगरपालिका वृक्ष लागवड, पाणी पट्टी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यात उदासिन आहेत. पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये १३० दिवसात फक्त ८०० झाडे लागली आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रशासकीय आढाव्याचा सविस्तर अहवाल नुकताच विभागीय आयुक्तालयात सादर झाला. त्यात ही बाब समोर आली आहे. अहवालात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यात २ लाख ६३ हजार २०० वृक्ष लागवडीचे उदिष्ट असतांना फक्त १४ हजार २८१ झाडांचीच लागवड झाली. १ जून ते १० ऑक्टोबर २०२२ साठी हे उद्दिष्ट होते. तालुकानिहाय उद्दिष्ट व प्रत्यक्षातील कामगिरी अशी. वैजापूर - ४३५९१ - ३,०००.सिल्लोड - ६१४६७ -४१००. पैठण ४३८४५- ८००. कन्नड- ४३०२५ - २०००.गंगापूर - २९२८७, २७५०. खुलताबाद १६६२४- ३२०. फुलंब्री - १७५९१ - ८११. सोयगाव - ७७६९-५००.
गंगापुरात १.५ टक्के पाणी पट्टी वसुली आठही नगरपालिकांत १ ऑक्टोबरपर्यंत आठ टक्के पाणीपट्टी वसुली झाली. १२ कोटी ३२ लाख रुपयांचे उद्दिष्ट असून ९९ लाखच मिळाले आहेत. तालुकानिहाय उद्दिष्ट आणि वसुली अशी. कन्नड - १ कोटी ७१ लाख - ६ लाख ८६ हजार. गंगापूर - १ कोटी ९२ लाख - ३ लाख १३ हजार. वैजापूर - ४ कोटी २ लाख - ३३ लाख ६५ हजार. सिल्लोड - १ कोटी ५१ लाख - १३ लाख ८२ हजार. पैठण - १कोटी ५१ लाख - १९,९०,०००.
सूत्रांनी सांगितले की, गेले वर्षभर खुलताबाद, सोयगावला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नव्हता. गेल्या आठवड्यातच विक्रम दराडे यांच्याकडे खुलताबाद तालुक्याचा कार्यभार देण्यात आला आहे. नगरपालिका प्रशासन विभागाच्या सहसंचालक अॅलिस पोरे यांनी सांगितले की, अनेक योजनांच्या अंमलबजावणीत औरंगाबाद जिल्हा खूप पिछाडीवर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.